Wednesday, 29 March 2017



दैनिक जनशक्ती या वृत्तपत्रात आजपासून दर बुधवारी 
'मन वढाय वढाय...' हा माझ्या स्तंभ सुरू झाला आहे, जरूर वाचा आणि कृपया आपल्या प्रतिक्रिया कळवा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

माणसातील माणुसकी म्हणजेच अध्यात्म

-    
सुमेधा उपाध्ये

     
समाजाचेच एक अविभाज्य अंग म्हणजे अध्यात्म असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाहीत्याचं कारण म्हणजे माणसांच्या समुहाचा समाज बनतो तर त्या समुहातील विविध व्यक्तिरेखा या आपापल्या संस्कारांची शिदोरी घेऊनच वावरत असतेव्यक्तीच्या हालचाली म्हणा किंवा त्यांची कर्म म्हणा ही त्यांच्यावरील संस्कारातून होत असतातहे संस्कार समाजाकडून होतात,घरातून होतातयाचवेळी ज्याच्या संपर्कात सतत येतो त्याचा वाण नाही पण गुण अंगी येतोचत्यामुळे समाजापासून ना राजकारण वेगळंना अर्थकारण वेगळंना अध्यात्म वेगळंएका समाजाचेच हे सर्व रंगमात्रमध्यंतरीच्या काळात अध्यात्माचा बागुलबुवा उभा करण्यात आलाशब्द पांडित्य वाढलं आणि सर्वसामान्य माणसं यापासून दुरावलीतसंच पैसा हे केंद्रबिंदू मानून सहज कष्ट न करता वेगवेगळ्या धर्माच्या नावाचा टिळा लावून म्हणायला संन्यासी पण प्रत्यक्षात पैसा मिळवण्याचा उद्देश ठेवून त्यांनी भाबड्यादेवभोळ्या मंडळींवर जाळं टाकलं आणि त्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू केलासमाजातही एक वर्ग होताच ज्याला कष्टाविना एका रात्रीत
श्रीमंतीचा राजमार्ग हवा होता,  गुप्तधनाचे प्रलोभन... यास अनेकजण बळी पडलेयामुळे कोणताही संबंध नसताना गालबोट लागले ते अध्यात्मालाच.  जीवन साधेपणानेसरळसोपे कसे जगता येईल आणि जे माझे आहेते दुस-याचेही आहेत्याचाही हक्क आहेयाची जाणीव करून देणारं, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारं अध्यात्म बाजूला पडलं.  जसा कॉम्प्यूटरमध्ये वायरस शिरतो तसाच या धार्मिक संस्कारातही शिरलाचउगाचच नको तेवढं बोजडपण वाढवलं गेलंनको तेवढं बाजारीकरण झालंत्यामुळं समाज यापासून दूर गेलामोठाले पांडित्य मांडणा-या ग्रंथांवर धुळ चढत गेली आणि आमच्या डोक्यातील जळमट वाढत गेली.
        जीवनात सर्वच अनुभव आपण स्वत:घेऊन शिकायचं म्हटलं  तर एक जन्म कमीच पडणारत्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेलम्हणूनच काही अनुभव पुस्तकातून घ्यावेतकाही दुस-याचं पाहून  शिकावं आणि आपल्याला स्वत:ला जगण्याच्या धडपडीत काही बरे बाईट अनुभव येत असतातचया महाराष्ट्राच्या भूमीत अध्यात्मिक अनुभवांचं गाठोडं खच्चून भरलेलं आहेया मातीतल्या संत मंडळींनी जे भरभरून ज्ञान दिलंयजी शिकवण दिलीय तिला तोड नाहीसामान्यातल्या समान्यजनांचं जगणं सुलभ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.देव माणसात शोधण्यास त्यांनी सांगितलंमात्रमध्यंतरीच्या भेसळीतूनच भेदाभेद आपण शुद्रबुद्धीने केलेस्वत:च्या रोजी रोटीचा विचार वाढलास्वार्थ बळावला आणि देवातही फुट पाडून त्यांना वाटून घेतलं आणि सुरू झाली तीदुकानदारी..हे चित्र केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादीत नाहीअवघ्या हिंदुस्तानात आहेपूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण सर्वत्र अनुभव सारखेचमात्रअध्यात्मातील दाखले कोणत्याही धर्मातील ग्रंथांमध्येपुस्तकांमध्ये किंवा संतांच्या शिकवणुकीत पाहिले तर एक समान धागाच दिसतोयापैकी कोणीही एकमेकांचा द्वेष करण्यास सांगितलेलं नाहीएक धर्म वाढवण्यासाठी दुसरा धर्म बुडवण्याची शिकवण दिलेली नाहीजे काही सद्या समाजात विष दिसतंय ते आपल्यातीलच काहींच्या स्वार्थी कुबुद्धीच्या मंथनातून निर्माण झालेलं आहेसमुद्र मंथनातून विष आणि अमृत हे दोन्ही बाहेर आलंपण तेव्हा विष पचवणारा भोलेनाथ होताआता हे विष पचवणारा कुणीच नाही म्हणून ते विष पाझरतंय ते जिथं खोलवर पाझरलं जाईल तिथं तिथं विनाशसंहारअत्याचारहोतो ही भावनायावर जालीम उपाय काय तर माणसातील सदसद् विवेक बुद्दी जागृत होणं महत्त्वाचंत्यासाठी  सात्विक विचार आत अगदी तळापर्यंत रूजणं महत्त्वाचंआपण एखादी कृती विचारपूर्वक करतो...
या सदरा अंतर्गत आपण आता भेटत राहणारच आहोतभारतातील अनेक स्थळ आहेतजी आजही आपले दिव्यत्त्व राखून आहेतअनेक अद्भूत अनुभव तिथं जाणवतातअनेक महात्मे आहेतजे हजारो वर्षांच्या परंपरेचं जतन आणि संवर्धन करताहेतमानव कल्याण हाच त्यांचा हेतू आहेआजही माणुसकीचा ओलावा शिल्लक आहे, अत्यंत हलाखिच्या स्थितीत स्वतराहूनही आपल्या ताटतल्या अर्ध्या भाकरीतून पाव तुकडा भाकरी दुस-याला देताहेतठिकठिकाणी माणसातला माणूस जागृत करणारे साक्षात्कार होतात आणि तेव्हाच या भारत देशाचं वैविध्य आणि सांस्कृतिक अध्यात्मिक वैभव काय आहे याची जाणीव होतेगरज आहे ती केवळ व्यस्त जीवनातील काही काळ त्यांच्यात वावरण्याची!

Friday, 10 March 2017

जीवनातली सुंदरता जागवूया...



...वाट पाहण्यात एक गम्मत आहे... वेगवेगळे पदर वाट पाहण्याचे असतात...त्यात काव्यही स्फुरतं...भेगाळल्या मातीत तृणपाती लवलवताना भासतात...पण हळूहळू वाट पाहणं हेच प्रारब्ध असल्याचं जाणवत ... गम्मत दूर दूर पळू लागते... दाट धुक्याचं भय वाटतं...काळोखाच्या वावटळीत नजर भेदरते ...खोल खोल दरीत जीव हेलकावत जातो... पहात रहायचं मग टोकावर... स्थितप्रज्ञ होऊन गटांगळ्याच्या गटांगळ्या...तुक्याचं विचारचक्र थांबलं... क्षीण आवाजातले..." श्रीराम जय राम जय जय राम ... "  शब्द हळू हळू जवळ येऊ लागले ...पायवाटंनं मसनवटीकडं दहा बाराजण जात होते...धोंड्याची तिरडी तशी हलकीच होती...

... 
शेतातला औत तसाच सोडून तुक्या मातीत फतकल मारून बसला होता...डोक्यावर सूर्य तळपत होता आणि घामाच्या धारा शेत शिंपत होत्या...तुक्याच्या डोक्यात मात्र भलतंच काव्य फेर धरत होतं...आशा निराशेच्या खेळातील सोंगटी होऊन जगण्याची आस झडत होती... तिरीमिरीत उठला आणि बांधावरच्या पांगिराला औताच्या दोरीचाच फास आवळला...

   गेली कित्तेक वर्ष राज्यात हेच सुरू आहे, आत्महत्यांनी हैदोस मांडलाय त्यांच्या जाळ्यात किमान 18 ते 45 वयोगटातील तरूणाई अडकलीय. तरूणाईचे जीवन असे अर्ध्यावर संपणं किंवा ते संपवावं असं तीव्रतेनं वाटणं हे कोणत्याही राज्याच्या वा देशाच्या प्रगतीला मारकच आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं लोण आता राज्यात अन्य भागातही पसरू लागलं, यात मराठवाडाही आता अस्पृश्य राहिलेला नाही. या आत्महत्येस प्रवृत्त करणारे यम पाश इतके मजबूत झालेयत कारण सततची नापिकी, ओला किंवा सुका दुष्काळ तर कधी व्यसनाधीनता, लग्नासाठीचा डामडौल परवडत नाही तरीही करणे या सर्वातून सावकारी कर्जाचा पाश वाढत जातोय...प्रत्येकाच्या मरणाची कथा वेगवेगळी असली तरीही एक धागा समान, तो म्हणजे हा जीवच नकोसा होणे. त्यातून आत्महत्या हाच एकमेव पर्याय आहे, हा विचार बळावणं. काहीजणांना आशा असते सरकारी मदत आलीच तर मागे राहिलेल्यांचे चार दिवस तरी सुखाचे जातील...जन्माला आल्यानंतर किमान गरजा तरी पूर्ण व्हाव्यात ही आस प्रत्येकाची असतेच. त्यात कमी अधिक झालेलं समजू शकतं... मात्र, एक दाणा घरात येत नाही, राबराब राबूनही सर्व कष्ट वांझ ठरतात तेव्हा काय करावं? सरकार दरबारी होणारी नोंद ही नेमकी कशी केली जाते हाही संशोधनाचा विषय असू शकतो...  आणि त्यानंतर येणारी गंगाजळी गावातल्या घरात पोहचेपर्यंत त्याला किती आणि कुठे कुठे गळती लागली हे ही तपासणं जरूरीचं नव्हे काय....वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील, सरकारी उपक्रम असतील प्रत्येकाचा हेतू आत्महत्या रोखणे हा आहे. सरकारने प्रेरणा प्रकल्प ‘ सुरू केला, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचा-यांना, स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं, जिल्हास्तरावरील तज्ज्ञांकडून समुपदेशन देणे सुरू आहे, मानसोपचार तज्ज्ञ, परिचारिका या सर्वांनी अगदी थेट घराघरात जाऊन पिचलेल्या शेतक-यांना आत्महत्येपासून रोखण्याचा प्रयत्न केला. जे शेतक-यांसाठी कार्य करीत आहेत ते वाखाणण्याजोगे आहे, पण त्यांचे हात आणखी मजबूत करण्याची गरज आहे. त्यांनाही सुविधा हव्यात, खेड्यात जाण्यास नकार देणारे डॉक्टर आजही संख्येने जास्त आहेत, त्यांनाही तिथे जाण्याची प्रेरणा देणे आवश्यक आहे.
     हे सर्व विविध पातळीवर होत असलं तरीही अनेकदा केवळ वरवरची मलमपट्टी अधिक होते आणि मूळ प्रश्नच बाजूला राहतो असं कायम दिसत आलंय. अलिकडे कित्येक गावातल्या शेती ओस पडताहेत, मात्र, शहराचा रस्ता धरला तरीही मिळणारी रक्कम दोन वेळचे जेवण देईल पण अन्य गरजांचे काय? एके काळचा शेतीप्रधान देश, अभिमान वाटावा असाच होता. 1966-67 ला भारतात हरितक्रांतीचे वारे घुमले, पीक पद्दतीत बदल , कमी पाण्यावरील रासायनिक शेतीलाही प्राधान्य दिले पण नंतर काय???  त्यानंतर काय हा मोठा प्रश्न प्रत्येक क्रांती नंतर उरतोच, त्याचे उत्तर शोधेपर्यंत अनेक जीव आपण गमावलेले असतात.
    आता पुन्हा बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन शेतक-यांची मानसिकता बदलणेही आवश्यक आहे. पारंपरिक पीक पध्दती बदलणं आणि शेतीच्या सोबत काही जोडधंदे देणे हा उपक्रम आता तुरळक का असेना पण होतोय. हे प्रयोग आता वाढवले पाहिजेत.  केवळ मदतीचे पैसे फेकून ही नसानसात भिनलेली जगण्याची भीती नष्ट होणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत हा दिलासा कृतीतून द्यावा लागेल. आपल्या प्रमाणेच समोरच्याचा जीवही मह्त्वाचा मानून त्याचा हात हाती घ्यावा लागेल, मायेचा ओलावा झिरपावा लागेल...आत्मविश्वास जागवावा लागेल. मनाची मशागत करून त्याला उभारी देणं आवश्यक आहे. त्यातून डोळ्यातील वाट पहाणे थांबेल... आणि जीवन सुंदर आहे हा विश्वास वाढेल. मग कुणा धोंड्याची वाट वेळे आधी स्मशाणाकडे जाणार नाही की कुणा तुक्याला पांगिराला फास आवळण्याची गरज भासणार नाही, एवढी आशा ठेवूया.
     


Tuesday, 7 March 2017

...मुक्त म्हणजे काय?

 “ती बाईक चालवते,
 व्वा छानच की, बरं पुढे...?”
 पाडव्याच्या मिरवणुकीत चालवते गाडी, तिला ढोल वाजवता येतो, ढोल वाजवत मिरवणुकीत सुंदर नाचते, आहे एकदम बिनधास्त आहे...  “
“  अच्छा... राव, आणखी काय करते ती    “
आणखी काय म्हणजे- पैसे कमावते, ऑफिसला जाते, नोकरीला आहे, दररोज,काय काय वेगवेगळ करते... सुंदर दिसते पाश्चात्य कपड्यांमध्ये    “
माझा पुढचा प्रश्न- लग्न झालंय का?  “

हा मग झालंय की, दोन मुलं आहेत, संसार करतेय, सुरळीची वडी सुद्धा झाकचं करते...आस्वादवाल्यापेक्षा मस्तच, बाईंच्यात धमक आहे,  बिनधास्त, स्वतंत्र विचारांची...
समाजात फिरताना स्त्रीचे असे कौतुक अनेकदा ऐकायला मिळते आणि त्या प्रत्येक वेळी मी विचारांमध्ये गढून जाते...हे सर्व म्हणजेच स्त्री मुक्ती का? हे ऐवढेच त्या चळवळीचे फलित मानायचे का?
       स्त्री मुक्ती चळवळीची वाटचाल आता चाळीस एक वर्षांची झाली, संपूर्ण जगात स्त्रियांच्या मुक्तीसाठी चळवळ उभी राहिली, प्रचंड विरोधात ही चळवळ पाय रोवत गेली आणि फोफावली. अनेक कायदे बदलले, स्त्रियांना दिलासा देणा-या अनेक गोष्टी घडल्या...स्त्री मुक्तपणे थोडातरी श्वास घेऊ लागली. स्त्रियांच्या बाजूचे कायदे आले ते या संघटनांच्या दबावामुळे, पीडित महिला आज पोलिसात जाऊ लागल्या, न्याय मागू लागल्यात, अत्याचाराच्या विरोधातील आवाज वाढू लागलाय. हे संघटनांना उभारी देणारे निश्चितच आहे. पण ज्या ज्या वेळी समाजात वावरताना वरील संवाद ऐकते तेव्हा मन विषण्ण होते. या पलिकडे काही आहे आणि त्यासाठी स्त्री आज उभी राहताना दिसत नाही ही सल अनेक संघटनांची आहेच.
    स्त्रियांचे स्वातंत्र म्हणजे नक्की काय?   “  अत्यंत सरळ सोपा प्रश्न पण मनात ठिय्या मारून बसलाय.
बाह्य पेहराव किंवा पुरूषांची मक्तेदारी असलेल्या सर्व क्षेत्रातला उल्लेखनीय शिरकाव, ऐवढाच स्त्री स्वातंत्र्यांचा अर्थ मर्यादित नक्कीच नाही. यापेक्षा खूप सखोल काही आहे, आणि तेच अजूनही समाज मनात रूजलेले नाही. यात स्त्री-पुरूष दोघेही आलेच. स्त्रीच्या स्वातंत्र्यात पुरूषांच स्थान आहेच. कारण प्रत्येक हुंकार पुरूषाच्या आदेशाने घेणारी स्त्री स्वत:ला शोधू पाहतेय त्याचे पडसाद पुरूष मनावरही उमटत राहणार आहेत...
      आजही किती घरांमध्ये स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य आहे? किती महिलांना मुल जन्माला घालण्यासंदर्भातील मत मांडता येते? ज्याचे पोषण या स्त्रीच्या रक्तावर होणार तिथे तरी ती स्वत: मत मांडते का? मी केवळ मत मांडण्याचे विचारतेय. ते ग्राह्य धरून स्वीकारणे ही फार पुढची पायरी आहे. किती महिलांचा सहभाग घरातल्या प्रत्येक निर्णयात असतो, मग तो घरातील सजावट असो, स्वैयंपाक असो  ( कारण तिला आवडते म्हणून काही तिथे शिजवले जाईल ही शक्यताही कमीच), किती महिलांचा सेविंगमध्ये किंवा मुलांना कोणत्या शाळेत घालावे, एकत्र कुटुंबातील निर्णय प्रक्रिया असो वा रोजच्या छोट्या छोट्या ते अगदी दूरगामी परीणाम करणा-या निर्णय प्रक्रियेत सहभाग किती असतो. आता हे दोन्ही बाजूने म्हणता येईल. त्यांना सहभागी किती करून घेतले जाते हा एक भाग आणि दुसरा भाग किती स्त्रियांना स्वत:लाही या जबाबदा-या घेऊन पेलण्याची इच्छा आतून आहे ? की त्यांनाही केवळ बाह्य वेषांतरामध्ये आणि दुपारच्या किटी पार्टीत नव-याच्या पैशांचीच उधळपट्टी करायची असते. त्यांनाही मला काही कळत नाही, असं म्हणून जवाबदारी झटकायचीय, सतत पुरूषांवर अवलंबून रहायचेय. म्हणजे स्वातंत्र्य हवे ते कसेही वागण्याचे पण जवाबदारी घ्यायची नाही, तिथे स्त्रित्त्वाच्या उबदार शालीत पडून सुरक्षीत असल्याचे मानत राहण्यात आनंद आहे. असे विचार मनात येतात तेव्हा अनेकदा ज्या व्यापक प्रमाणात स्त्रिवादी चळवळीला यश यायला हवे होते ते का आलेले दिसत नाही, या प्रश्नाच्या उत्तराकडेही जाता येते.
     मुळात या स्त्री स्वातंत्र्यावर आजही आवाजच उठत राहिलाय कारण स्त्रीच्या विचारांमध्येही फारसा बदल झाला नाही. वैचारीक गुलामगिरीतून ती स्वत: ही बाहेर येण्यास ध़डपडत नाही, असे चित्र अनेकदा दिसते. मेकअप हा वर वरचा असतो तो अंतरंगात सुंदरता आणू शकत नाही.  आम्ही नेमके तेच केले बाह्यांगावर संस्कार करत राहिलो आणि अंतरंगाची मशागत करायलाच विसरलो. त्यामुळे जिच्या विचारात आमुलाग्र बदल झालाय, जी समाजात आत्मविश्वासाने निर्णय घेते, मत पटवून देते, ठाम राहते, ती स्त्री खरी मुक्त...मग भलेही तिचे बाह्य स्वरूप कोणतेही असेल जे तिला सहजतेने वावरण्यास मदत करणारे असेल तसा पोषाख असेल पण ती विचारांनी मुक्त आहे, आमच्या खेड्यातल्या आदिवासी पाड्यावरची जास्वंदी यात मला अधिक भावते,- ती स्वत: शेतीत राबते, चिल्लापिल्लांना आंबिल भरवते आणि नवरा संध्याकाळी मोहाची पावशेर पोटात रिचवून आला, तमाशा करून तिला मारू लागला तर ती चुलीतले जळते लाकूड त्याच्या डोस्क्यावर आपडते, तो गुमान झोपडीत कडेला पडतो. अशा सर्व  परिस्थितीत एकटी लढत राहणे हे या महिलांकडून शिकावे असेही वाटतं, कारण एक जास्वंदीच नव्हे तर अशा अनेक जास्वंदी इथे पहायला मिळतात, आर्थिक परिस्थितीने त्या पिचलेल्या असतील पण स्वत:च्या मनगटावर संसाराचा गाडा ओढून आपला आत्मसन्मान कसा राखायचा हे यांना जास्त उमजलेय असे दिसते, जे शहरी महिलांमध्ये अभावाने आढळते. म्हणूनच आत्मसन्मान चेतवणा-या अशा स्वतंत्र स्त्रियांना त्रिवार मानाचा मुजरा !!!

-          - सुमेधा उपाध्ये